२४ ग्रामपंचायतींनी रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:15+5:302021-08-14T04:35:15+5:30

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनामुक्त गाव, ग्रामपंचायतीची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेंतर्गत जिल्ह्यातील २४ ...

Outbreak of corona prevented by 24 gram panchayats | २४ ग्रामपंचायतींनी रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव

२४ ग्रामपंचायतींनी रोखला कोरोनाचा प्रादुर्भाव

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनामुक्त गाव, ग्रामपंचायतीची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेंतर्गत जिल्ह्यातील २४ गावांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले असून, प्रत्येक तालुक्यातील प्रथम तीन ग्रामपंचायतींचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी रविवारी सत्कार केला जाणार आहे.

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींमध्ये जालना तालुक्यातील दहिफळ - प्रथम, सोनदेव धारा - द्वितीय, तांदूळवाडी बुद्रूक ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकाविला. बदनापूर तालुक्यातील अंबडगावला प्रथम, पाडळी द्वितीय तर मात्रेवाडी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकाविला. अंबड तालुक्यातील वडीगोद्री प्रथम, धनगरपिंप्री द्वितीय तर शहागडला तृतीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड प्रथम, बाचेगाव द्वितीय तर नागोबाची वाडी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मंठा तालुक्यातील नायगाव प्रथम, वांजोळा द्वितीय तर विडोळी खुर्दला तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. परतूर तालुक्यातील खांडवीवाडी प्रथम, श्रीधरजवळा द्वितीय तर पांडेपोखरीला तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. भोकरदन तालुक्यातील आडगाव प्रथम, नळणी बुद्रूक समर्थनगर द्वितीय तर खामखेडाला तृतीय पुरस्कार मिळणार आहे. जाफराबाद तालुक्यातील खासगाव प्रथम, वरुड बुद्रूक द्वितीय तर माहोरा या ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकाविल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.

Web Title: Outbreak of corona prevented by 24 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.