जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:20+5:302021-01-15T04:25:20+5:30
संत जगनाडे महाराज यांना अभिवादन जालना : संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदीखाना येथील तेली समाज पंचायती वाड्यात प्रतिमा ...

जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन
संत जगनाडे महाराज यांना अभिवादन
जालना : संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदीखाना येथील तेली समाज पंचायती वाड्यात प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबूराव व्यवहारे, शिवाजी थोरात, नगरसेवक विष्णू वाघमारे, सुनील साखरे, पांडुरंग राऊत, अजित भालेराव, शंकर सोनवणे, अतुल व्यवहारे, सदाशिव देशमाने, जनार्दन घोडके, बाबासाहेब साखरे, अशोक व्यवहारे आदींची उपस्थिती होती.
खुर्चीसाठी राजकीय विरोधक आले एकत्र
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा ग्रामपंचायतीसाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात राजकीय आखाडे बांधून प्रचार केला. परंतु, खुर्चीसाठी गावातील विरोधक एकत्र आले असून, त्यांनीही प्रचाराची यंत्रणा जोरात राबविली आहे. भाजपच्या संदीप शेळके गटाने निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे. या गटाला शह देण्यासाठी भाजपाचेच मुरकुटे गटाने विरोधी गटाला जवळ करीत निवडणुकीची यंत्रणा राबविली. मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांवर मतदार प्रश्नांचा भडीमार करीत आहेत. रस्त्यांसह इतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाला खुर्चीत बसण्याची संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे.