व्यापाऱ्यांचे संघटन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:03+5:302021-08-18T04:36:03+5:30

बैठकीतील निर्णय : सहानी जालना : व्यापाऱ्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा व्यापारी असोसिएशनची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत ...

The organization of traders is important | व्यापाऱ्यांचे संघटन महत्त्वाचे

व्यापाऱ्यांचे संघटन महत्त्वाचे

बैठकीतील निर्णय : सहानी

जालना : व्यापाऱ्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा व्यापारी असोसिएशनची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत ‘मैं भी सदस्य हूं’ या स्टीकरचे विमोचन करण्यात आले.

या बैठकीस जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष विनीत सहानी, लॉयन्स क्लबचे उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे शहर अध्यक्ष राजेश राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती हेाती. अर्थव्यवस्थेला संकटकाळात बळकटी देण्यासाठी व्यापाऱ्यांचा मोठा हिस्सा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वेगवेगळ्या संकटाच्या वेळी व्यापाऱ्यांनी सर्व ती मदत केलेली आहे. कोरोना काळातही व्यापाऱ्यांनी अनेक गरजूंना मदत केल्याचे सहानी म्हणाले.

यावेळी महासचिव संजय दाड, कार्यकारी सचिव श्याम लोया, कोषाध्यक्ष विजय राठी, कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, बंकट खंडेलवाल, गोवर्धन अग्रवाल, इंदरचंद तवरावाला, अर्जुन गेही, प्रमोद गंडाळ, ईश्वर बिल्लोरे, विजयराज सुराणा, विनोद कुमावत, राजेश कामड, विजय बगडिया, डॉ. संजय रुईखेडकर, मनोज पाचफुले, विनोद पवार, राम अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, रमेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

Web Title: The organization of traders is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.