इंधन निर्भरता कमी करण्यासाठी सौरऊर्जा वापरास देशात प्रोत्साहन
By Admin | Updated: June 7, 2017 00:24 IST2017-06-07T00:23:31+5:302017-06-07T00:24:35+5:30
जालना : आखाती राष्ट्रातून कच्च्या तेलाची आवक कमी करण्यासाठी देशांतर्गत सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंंद्र प्रधान यांनी दिली.

इंधन निर्भरता कमी करण्यासाठी सौरऊर्जा वापरास देशात प्रोत्साहन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आखाती राष्ट्रातून कच्च्या तेलाची आवक कमी करण्यासाठी देशांतर्गत सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंंद्र प्रधान यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रधान म्हणाले, की साठ वर्षांत १४ कोटी कुटुंबाकडे एलपीएजी जोडण्या होत्या. यात गत तीन वर्षात सात कोटींनी वाढ झाली आहे. भाजप सरकारने एलपीजी गॅस वितरण प्रणालीत अधिकाधिक पारदर्शकता आणली. ग्रामीण भागातील महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत कमी दरात गॅस उपलब्ध करून दिला. तसेच गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन केले. यास सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे शक्य झाले. आतापर्यंत एक कोटी नागरिकांनी गॅस अनुदान नाकारले आहे. जालन्यातूनही यास चांगला प्रतिसाद मिळाला. गॅस अनुदान सोडणारे जालन्यातील ट्रक चालक शेख गफ्फार व एका सेवानिवृत्त शिक्षकास प्रधान यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होतो याबाबत विचारले असता, व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्यास हे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी सांगितले. भारत सरकार किती दिवस इतर देशातून कच्च्या तेलाची आयात करणार याबाबत स्पष्टीकरण देताना आपल्याकडे कच्च्या तेलाची नैसर्गिक उपलब्धता नाही. त्यामुळे इतर देशांतून तेल आयात करावेच लागेल. मात्र, हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, भास्कर दानवे, माजी आ. अरविंद चव्हाण, उद्योगपती घनश्याम गोयल, विलास खरात, किशोर अग्रवाल रामेश्वर भांदरगे आदी उपस्थित होते.