अधिकाऱ्यांच्या वेतनातून रक्कम वसूल करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:12+5:302021-08-15T04:31:12+5:30
देऊळगावराजा : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून शेती उपयोगी साहित्य ...

अधिकाऱ्यांच्या वेतनातून रक्कम वसूल करण्याचे आदेश
देऊळगावराजा : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून शेती उपयोगी साहित्य वाटप योजनेत आर्थिक अनियमितता केल्याची तक्रार चंद्रकांत खरात यांनी शासनाकडे केली होती. शासन निर्देशानुसार झालेल्या चौकशीत अनियमितता आढळून आली असून, संबंधित अनियमिततेतील रक्कम संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.
शासन आदेशानुसार, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात करणे सुरू झाले आहे. यामध्ये लिपिक डी.पी. मुंढे यांच्या वेतनातून ९ लाख ५९ हजार २३३, एस.पी. सवदडकर- ११ हजार ३२२, ए.के.वाकोडे- १० हजार ६५६, यू.एस. चिंचोले १६ हजार ६५०, एन.एन. डाबेराव ८१ हजार ५३५, मारोडकर, सोळके, मोरे, गवई, बोडखे, डाखोरे यांच्याकडून ५४ हजार ३४१, बी.एम.खेडकर यांच्याकडून ८ हजार १००, एस.एच.पवार यांच्याकडून २ लाख ४० हजार, संजय हिंमतराव पवार यांच्याकडून १ लाख ४० हजार, एस.एन. मंजुळकर यांच्याकडून २४ हजार ८६६, जी.बी.इंगळे यांच्याकडून ६९ हजार ९०५, एस.डी.थवील यांच्याकडून १० हजार, एस.डी. बोन्द्रे यांच्याकडून २,७००, टी.ए. मेहेत्रे ६,३०० रुपये वसूल केले करण्याचे सूचित केले होते. कृषी विभागाने दखल घेऊन चौकशी करीत, संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रलंबित लोकवाट्याची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे तक्रारदार खरात यांनी सांगितले.