फळबाग पंचनाम्यांच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:29 IST2021-03-06T04:29:33+5:302021-03-06T04:29:33+5:30

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी परतूर : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण- ...

Order of inquiry of orchard panchnama | फळबाग पंचनाम्यांच्या चौकशीचे आदेश

फळबाग पंचनाम्यांच्या चौकशीचे आदेश

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

परतूर : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. शिवाय याचा नाहक त्रास महिलांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी

जालना : जालना ते मंठा मार्गावर अनेक ठिकाणचे दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. दिशादर्शक, सूचना फलक नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. शिवाय अपघात प्रणव क्षेत्रातील अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गरजेनुसार सूचना फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Order of inquiry of orchard panchnama