शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भीम फेस्टिव्हलचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:26 IST

तीनदिवसीय भीम महोत्सवाचे रविवारी थाटात उदघाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पौष पौर्णिमेच्या साक्षीने जालन्यात भीम महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्राणिमात्राची हत्या करू नये, चोरी करणे पाप आहे, व्यभिचार करणे चूक आहे, मद्यपान करू नये या पंचशीलावर धम्म उभा आहे. या पंचशीलाची समाजाला नितांत आवश्यकता असून पंचशीलाचे अनुकरण केल्यास जीवनाला कलाटणी मिळेल, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय भीम महोत्सवाचे रविवारी थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद भिक्षु संघातर्फे बुद्धवंदना आणि अर्जुन खोतकर आणि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या प्रतिमेला मार्ल्यापण आणि दीपप्रज्वलन करून या भीम महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी बोलताना खोतकर म्हणाले की, भारतातून सुरू झालेला बुद्धांचा धम्म आज जगभरात पोहचला आहे. बुद्धांचे विचार समाजात पोचविण्याचा आपण सर्वांनी संकल्प करावा. जालन्यातील हा भीम फेस्टीवल यावर्षीपुरता मर्यादित नसून यापुढेही दरवर्षी सातत्याने आयोजित करण्यात येईल. जालन्यातील हा भीम फेस्टीवल राज्यभरात आदर्श ठरेल. आगामी काळात जालना भीम फेस्टिवलमध्ये दलाई लामा यांना आमंत्रित करून जालनेकरणा त्यांचे विचार ऐकण्याचा सुवर्णयोग घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार ही  खोतकर यांनी व्यक्त केला.दरम्यान, भीम फेस्टीवलच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध कलाकार जॉली मोरे आणि सीमा पाटील यांचा भीम बुद्धगीतांचा नजराणा पोवाडा आणि शाहिरी भीम गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. यावेळी अ‍ॅड. बी. एम. साळवे, किशोर घोरपडे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, अभिमन्यू खोतकर, संजय खोतकर, अ‍ॅड. भास्कर मगरे, गणेश रत्नपारखे, सुधाकर रत्नपारखे, गुलाब पाचगे, प्रमोद रत्नपारखे, विष्णू पाचफुलें, अशोक साबळे, पांडुरंग डोंगरे, रमेश गव्हाड, मगन पवार, परमेश्वर गरबडे, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, अ‍ॅड. बबन मगरे, भाऊसाहेब घुगे, सुदाम सदाशिवे, संजय इंगळे, चेतन कांबळे, सगीर अहेमद, अरुण मगरे, योगेश रत्नपारखे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :SocialसामाजिकArjun Khotkarअर्जुन खोतकर