उघड्यावरील खाद्यपदार्थ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:38 AM2019-01-14T00:38:58+5:302019-01-14T00:39:20+5:30

शहरात ठिकठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवून त्याची विक्री सुरू असून, यामुळे जालनेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Open food; Health question on the anagram | उघड्यावरील खाद्यपदार्थ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

उघड्यावरील खाद्यपदार्थ; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात ठिकठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवून त्याची विक्री सुरू असून, यामुळे जालनेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, व्यावसायिकांना कारवाईची कसलीही भीती उरलेली नसतानाच हे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनाही आपल्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जालना शहरात विविध ठिकाणाहून नागरिकांचा सातत्याने राबता असतो. त्यामुळे मुख्य मार्गावरील तसेच बसस्थानक, शासकीय कार्यालय परिसरातील हॉटेल्समध्ये खाण्या-पिण्यासाठी सातत्याने वर्दळ दिसून येते.
मात्र, ग्राहकांना खाण्यासाठी देण्यात येणारे हे अन्नपदार्थ सुरक्षितरीत्या झाकून ठेवण्याकडे व्यासायिकांचा कानाडोळा होत असल्याचे चित्र आहे. शिवाय, अनेक ठिकाणी हातगाड्यांवर अन्नपदार्थांची विक्री होत असून, याच्या आजूबाजूलाही कमालीची दुर्गंधी व घाण साचल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या शहराच्या अनेक भागांत प्रशासनाच्या वतीने रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ होत आहे. उघड्या अन्नपदार्थांवर ही धूळ जात असल्यामुळे हे पदार्थ खाण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून अधून-मधून अशा व्यावसायिकांवर कारवाईचा फार्स केला जात असला तरी याची फारशी भीती व्यावसायिकांमध्ये असल्याचे दिसून येत नाही.
कारवाई झाली तरी नियमानुसार दंड भरून हे व्यावसायिक पुन्हा आपला व्यवसाय त्याच पध्दतीने सुरू ठेवतात. त्यामुळे या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे.
सूचना : ग्राहकांनी काळजी घ्यावी
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभरामध्ये हॉटेलमधील अन्नपदार्थ नमुन्यांची तपासणी करण्यात येऊन संबंधितांना सुधारणा नोटिसाही बजावण्यात आल्या. यापुढेही कारवाई चालूच राहील. परंतु, ग्राहकांनी देखील आपण खात असलेले अन्नपदार्थ झाकून ठेवलेले किंवा स्वच्छ आहेत की नाहीत, हे पाहणे गरजेचे असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. ई. देसाई यांनी सांगितले.
८७ नमुन्यांची तपासणी
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभरात जिल्ह्यातून वेगवेगळ्या अन्नपदार्थांचे ८७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातील ७४ नमुने प्रमाणित तर १ नमुना अप्रमाणित आढळून आला. तर तीन प्रकरणांमधील अहवाल अद्याप बाकी आहे. अप्रमाणित नमुन्यांबाबतचा अहवाल सहायक आयुक्तांकडे दाखल करण्यात आला असून, यात या व्यावसायिकांवर ठेवलेले आरोप सिध्द झाल्यास किरकोळ त्रुटींसाठी दहा लाखांपर्यंतचा दंड व गंभीर बाबीसाठी ६ महिने ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
३९ हॉटेल चालकांना नोटिसा
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ८० हॉटेल्सची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये ३९ हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्याचे सहायक आयुक्त देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Open food; Health question on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.