शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

... तेव्हाच उपोषण सोडणार; आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 09:44 IST

औषधोपचार घ्या, जरांगे यांना हायकाेर्टाचे निर्देश, सलाईन दिले, रक्त तपासणीनंतर पुढील उपचार

सगेसोयरे अध्यादेशाची आम्ही दिलेल्या व्याख्येसह अंमलबजावणी करावी, सर्व गुन्हे मागे घ्यावेत, यासह नऊ मागण्यांबाबत मंत्र्यांच्या स्वाक्षरीनुसार लेखी द्या, अन्यथा उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे- पाटील यांनी मांडली.

मुंबई :  औषधोपचार घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना दिले. जालनाचे सिव्हिल सर्जन डॉ. चावरे हे जरांगे-पाटील यांची तपासणी करतील आणि उपचाराबाबत निर्णय घेतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

जरांगे-पाटील हे उपोषण करून  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. लोकांना चिथावणी देत आहेत, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अजय गडकरी व न्या. श्याम चांडक  यांच्या खंडपीठापुढे होती. 

न्यायालयाच्या आदेशानुसार जरांगे यांना विनंती केली. त्यांनी उपचारास होकार दिला, आम्ही सलाइन लावून त्यांना इंजेक्शन दिले आहेत. त्यांच्या सर्वच ब्लड चाचण्या करण्यासाठी त्याचे सॅम्पल देण्यात आले आहे. त्यानंतर त्यानुसार उपचार करण्यात येईल.        - डॉ. राजेंद्र पाटील,    जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा