शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:46 IST

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या धरणावर भोकरदन शहर, देहेड, कठोरा बाजार, सुरंगळी, वाडी, कल्याणी, करंजगाव, मुर्तड, दगडवाडी, तळणी, भायडी, निंम्बोला, मलकापूर, मनापूर, विरेगाव, बाभुळगाव, सिपारा बाजार, वरुड, पिंपळगाव यासह इ. गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, यावर्षी पावसाने दगा दिल्याने धरणात पाण्याची आवक आली नाहीच. त्यामुळे धरणात केवळ दोन टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा पाणीसाठा फ्कत पंधरा दिवस पुरेल, इतकाच आहे. परिणामी ज्या गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्या गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.यावर्षी पाऊस न आल्याने धरणात पाण्याचा एकही थेंब आला नाही. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात या धरणात १२.५ फूट म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यावर्षी हे धरण १०० टक्के कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिसरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, धरणात मागील काही दिवस विद्युत पंप सुरु होते. याबाबत शाखा अभियंता पी. सी. मसने म्हणाले की, धरणात आता कोणताही विद्युत पंप सुरु नाही.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई