केवळ १२९ जणांची तपासणी, सहा जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST2021-08-18T04:35:59+5:302021-08-18T04:35:59+5:30
आरोग्य विभागास मंगळवारी १२९ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात सहा जणांना बाधा झाल्याचे समोर आले असून, पॉझिटिव्हिटी रेट ...

केवळ १२९ जणांची तपासणी, सहा जणांना बाधा
आरोग्य विभागास मंगळवारी १२९ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात सहा जणांना बाधा झाल्याचे समोर आले असून, पॉझिटिव्हिटी रेट ४.६५ वर गेला आहे. यात आरटीपीसीआरच्या ९४ जणांच्या तपासणीत सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ॲँटिजनच्या ३५ जणांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील दोघांचा समावेश आहे. मंठा तालुक्यातील पिंपळगाव-१, नानसी-१ तर अंबड शहरातील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. भोकरदन शहरातील एकाला बाधा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अंबड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील संस्थात्मक अलगीकरणात पाच जणांवर उपचार केले जात आहेत.
जिल्ह्यात ६१ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात सध्या ६१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील काहींवर रुग्णालयात तर काहींवर गृह अलगीकरणात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ६६२ वर गेली असून, त्यातील ११८४ जणांचा बळी गेला आहे. तर आजवर ६० हजार ४१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.