व्यायामशाळेतून एकाचा मोबाईल चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:05+5:302021-06-16T04:40:05+5:30

पाळत ठेवून लोखंडी रॉडने मारुन केला खून जालना : इवायाच्या सोबत होणाऱ्या सतत भांडणाच्या कारणावरुन पूर्वनियोजित कट रचून पाच ...

One's mobile phone was stolen from the gym | व्यायामशाळेतून एकाचा मोबाईल चोरला

व्यायामशाळेतून एकाचा मोबाईल चोरला

पाळत ठेवून लोखंडी रॉडने मारुन केला खून

जालना : इवायाच्या सोबत होणाऱ्या सतत भांडणाच्या कारणावरुन पूर्वनियोजित कट रचून पाच जणांनी एकास लोखंडी रॉडने मारहाण करीत मुलाला जिवे मारल्याची तक्रार घनसावंगी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ही घटना घनसावंगी तालुक्यातील अंबड रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ घडली. या प्रकरणी सोमीना बाळाभाऊ कऱ्हाळे (तनवाडी, ता. घनसावंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दामोधर पाटीलबा शेडगे, जगदीश दामोधर शेडगे, ज्ञानदेव पाटीलबा शेडगे, किशोर ज्ञानदेव शेडगे, कल्याण ज्ञानदेव शेडगे यांच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पतंगे हे करीत आहेत.

कांचननगर येथून दुचाकी लंपास

जालना : जालना शहरातील कांचननगर भागातून एकाची दुचाकी चोरुन नेली आहे. या प्रकरणी शिवकुमार वसंतराव सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक साळवे हे करीत आहेत.

दारू बाळगणाऱ्या दोन जणांवर केल्या कारवाया

जालना : विनापरवाना दारू बाळगणाऱ्या दोन जणांवर कारवाई करण्यात आल्याची घटना जालना तालुक्यातील सेवली परिसरात घडली आहे. सावरगाव भागडे येथीला एका महिलेविरुद्ध तर श्रीराम नाथा अंभोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नागरगोजे हे करीत आहेत.

Web Title: One's mobile phone was stolen from the gym