इदगाहजवळील चौकाजवळ एकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:22+5:302021-02-20T05:28:22+5:30

जालना : लघुशंकेसाठी थांबलेल्या इसमाला दोघांनी चाकूने मारून जखमी केले. त्यानंतर त्याच्याजवळील एक लाख ५० हजार रुपये बळजबरीने हिसकावून ...

One was robbed near the square near Idgah | इदगाहजवळील चौकाजवळ एकास लुटले

इदगाहजवळील चौकाजवळ एकास लुटले

जालना : लघुशंकेसाठी थांबलेल्या इसमाला दोघांनी चाकूने मारून जखमी केले. त्यानंतर त्याच्याजवळील एक लाख ५० हजार रुपये बळजबरीने हिसकावून फरार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील इदगाहजवळील पुलाजवळ घडली. या प्रकरणी समीर पी. शेख जमिल (२८) यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

समीर पी. शेख जमिल हे गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दुखीनगर येथून दुचाकीने बसस्थानकमार्गे जात होते. साडेसात वाजण्याच्या सुमारास ते इदगाहजवळील पुलाजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर चाकू मारून जखमी केले. तसेच खिशातील एक लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून नेली. या प्रकरणी समीर पी. शेख जमील यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: One was robbed near the square near Idgah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.