विनयभंग प्रकरणी एकास तीन वर्षाचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:49+5:302021-02-05T08:01:49+5:30
एक अल्पवयीन मुलगी २ एप्रिल २०१९ रोजी दुपारी घरी टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी तिच्या घरी आलेल्या सतीश समाधान ...

विनयभंग प्रकरणी एकास तीन वर्षाचा सश्रम कारावास
एक अल्पवयीन मुलगी २ एप्रिल २०१९ रोजी दुपारी घरी टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी तिच्या घरी आलेल्या सतीश समाधान नेमाणे याने तिचा विनयभंग केला. तसेच यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता. तिने घडला प्रकार तिच्या मामांना सांगितला. त्यानंतर पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, सहायक सरकारी वकील अॅड. वर्षा मुकीम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश स. गो. देशमुख यांनी आरोपी सतीश नेमाणे याला ३५४ भादंवि नुसार दोन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, ३५४ (ब) भादंविनुसार दोन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व ८ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती अॅड. वर्षा मुकीम यांनी दिली.
सात जणांची सक्ष महत्त्वाची
या प्रकरणात सरकारी पक्षाकडून एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी, तिच्या मैत्रिणी, पीडित मुलीचे मामा, शाळेचे मुख्याध्यापक व पोलिसांनी तपासलेले साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली.