क्रीडा प्रबोधिनीसाठी शिक्षक देणार एक हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:55+5:302021-01-19T04:32:55+5:30

जिल्हा परिषद सेस फंडातून व मानव विकास कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण जिल्हा योजनेतून जिल्हा परिषद शाळेतील ८ ते १४ वयोगटातील ...

One thousand rupees will be given by the teacher for the sports academy | क्रीडा प्रबोधिनीसाठी शिक्षक देणार एक हजार रुपये

क्रीडा प्रबोधिनीसाठी शिक्षक देणार एक हजार रुपये

जिल्हा परिषद सेस फंडातून व मानव विकास कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण जिल्हा योजनेतून जिल्हा परिषद शाळेतील ८ ते १४ वयोगटातील ५० मुले व ५० मुलींसाठी निवासी क्रीडा प्रबोधनी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत असलेल्या मुला-मुलींना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडाविषयक नैपुण्य दाखविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी या हेतूने निवासी क्रीडा प्रबोधिनी सुरुवात करण्यात आली आहे. मानव विकास अंतर्गत उपलब्ध निधीतून इमारत बांधकाम सुरू आहे. येथे मुलांच्या राहण्यासाठी, जेवणाची व्यवस्था, क्रीडा मार्गदर्शकांना मानधन, कार्यालय खर्च जिल्हा परिषद सेस फंड व समाज सहभागातून खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दरवर्षी रुपये ७२ लक्ष एवढा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून मंजूर रकमेची मर्यादा पाहता जिल्हा परिषदेला प्राप्त होणाऱ्या अनुदानाशिवाय लोकसहभागातून निधी जमा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील विभाग प्रमुखांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एक हजार रुपये निधी द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद देत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अनुदान देणार आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नैपुण्य दाखवण्याची संधी या उपक्रमामुळे मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना निधी कमी पडत असून, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक सामाजिक जबाबदारीने जानेवारी वेतनातून एक हजार रुपये निधी देणार आहेत.

संतोष राजगुरू

प्रहार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना

Web Title: One thousand rupees will be given by the teacher for the sports academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.