शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

हात उसने पैस्यांवरून मारहाणीत एकाचा मृत्यू, तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 5:05 PM

उसने पैसे परत न दिल्यावरून झाला वाद 

तीर्थपुरी : उसणे घेतलेले पैसे मागितल्याचा राग धरून तीन जणांनी एकाला मारहान केली. यात एकाचा मृत्यू झाला असून, तीन जखमी झाले आहेत. ही घटना घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ खरात येथे गुरूवारी रात्री घडली. यातील संशयीत तीन आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे. कैलास संजय खरात (३७) असे मयताचे नाव आहे. 

मयताचा भाऊ विशाल खरात यांनी दिलेल्या फियार्दीवरून पोलिसांनी सांगितले की, मयत कैलास खरात यांचे गावातील गजानन आप्पासाहेब खरात यांच्याकडे उसनवारीचे दहा हजार रूपये अनेक महिन्यांपासून होते. पैसे देण्यास गजानन टाळाटाळ करीत होता. १६ एप्रिल रोजी कैलास खरात याने पैसे मागितल्याचा राग धरून गजानन खरात, किरण खरात व आबासाहेब खरात यांनी कैलास यास गावातील मारूती मंदिराजवळ लोखंडी पाईपसह काठीने मारहाण केली. दरम्यान मयताचा भाऊ विशाल खरात, तफान खरात व किशोर खरात हे वाद सोडविण्यासाठी गेल्याने त्यांनाही मारहाण करण्यात आली. मयत कैलास खरात यांनी रात्री साडेदहा वाजता गोंदी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती. घरी येताच कैलास यांना त्रास सुरू झाला आणि रात्री अडिच वाजता त्यांचा मृत्यू झाला. सदरील प्रकरणी विशाल संजय यांच्या फियार्दीवरून तीर्थपुरी पोलीस पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी गजानन खरात किरण, आप्पासाहेब खरात व आबासाहेब खरात यांना शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतले होते. पुढील तपास तीर्थपुरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, हेडकॉन्सटेबल ज्ञानेश्वर कंटुले, श्रीधर खडेकर करीत आहेत.

टॅग्स :MurderखूनJalanaजालनाArrestअटक