शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन गोलापांगरी येथे एकजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:38 IST

दतात्रय बापुराव वायाळ (४०) असे मृताचे नाव असून आज सकाळी तालुक्यातील गोलापांगरी येथे ही घटना घडली. 

जालना :  खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरुन पडल्यानंतर पाठीमागून येणारा ट्रक डोक्यावरुन गेल्याने एकजण जागीच ठार झाला. दतात्रय बापुराव वायाळ (४०) असे मृताचे नाव असून आज सकाळी तालुक्यातील गोलापांगरी येथे ही घटना घडली. 

आज सकाळी मंठा तालुक्यातील बदु्रक पांगरी येथील रहिवासी दतात्रय वायाळ हे दुचाकीने   (क्रमांक एम. एच. २८ ए. वाय. ६७४१) गोलापांगरी मार्ग अंबड कडे निघाले होते. गोलापांगरी ते अंबड रस्त्याची खड्यामुळे दुरवस्था झाली आहे. मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होते. येथेच खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वायाळ यांची दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. याच दरम्यान, पाठीमागून सुसाट येत असलेला कांद्याचा एक ट्रक ( क्रमांक एम.एच. १८ बी.ए.७९८८ ) त्यांच्या डोक्यावरुन गेला. यात गंभीर जखमी होऊन वायाळ जागीच गतप्राण झाले. विशेष म्हणणे वायाळ यांनी हेल्मेट घातले होते. मात्र ट्रक डोक्यावरुन गेल्याने हेल्मेटचा चुराडा झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक रस्त्यावर सोडून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक निबाबासाहेब बोरसे, सहायक पोलीस निरीक्षक के. एस. नाडे ,बी. एन. ढाकणे यांच्या पथकांनी घटनास्थळी  भेट देऊन पंचनामा केला.ट्रक जप्त केला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalanaजालना