शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:10 IST

अज्ञात वाहनाने धडक दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : अज्ञात वाहनाने धडक दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. भोकरदन-जाफराबाद रस्त्यावरील विरेगावजवळ सोमवारी दहाच्या सुमारास ही घटना घडली. सोमीनाथ रामराव शेळके (२८ रा. प्रल्हादपूर), असे मृत युवकाचे नाव आहे, तर गंभीर जखमी रामेश्वर साहेबराव बरडे (२६) औरंगाबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रल्हादपुर येथील सोमीनाथ रामराव शेळके व फत्तेपुर येथील रामेश्वर साहेबराव बरडे हे दोघे दुचाकीवरून (एमएच २० सीडी ७७२) कामानिमित्त विरेगावकडे जात होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास विरेगावजवळ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यामळे दोघांनाही जबर मार लागला.अपघातानंतर वाहनचालक न थांबता तसाच निघून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, गणेश पायघन, देवकर, विजय जाधव हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, याच वेळी शिवसेनेचे मनिष श्रीवास्तव हे पारधकडून भोकरदनकडे जात असताना त्यांनी तातडीने दोन्ही युवकांना आपल्या वाहनातून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे दोघांवर प्रथमोपचार करून तातडीने ओरंगबादला हलविण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे सोमीनाथ शेळके याचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर रामेश्वर बरडे याच्यावर भोकरदन येथ प्रथमोपचारकरून पुढील उपचारासाठी औरंगबादला हलविण्यात आले. सोमिनाथ शेळके याच्यावर प्रल्हादपूर येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अपघात घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी काहीजण फोटो घेण्यासह शुटिंग करण्यातच मग्न राहिले. त्यामुळे अपघातग्रस्त दोघेही अर्धा तास रस्त्यावर तसेच पडून होते, असे सूत्रांनी सांगितले. तातडीने उपचार मिळाले असते तर सोमिनाथचे प्राण वाचले असते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू