अशोक नाना ठोंबरे (४०) असे मयताचे नाव आहे. चांधई ठोंबरी येथील अशोक ठोंबरे हे कुटुंबासह शेतात राहतात. ते शनिवारी संध्याकाळी जेवण करून झोपले होते. सकाळी ते घरात दिसले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांनी शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत आजिनाथ नाना ठोंबरे यांनी राजूर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार हसनाबाद ठाण्याचे सपोनि. संतोष घोडके यांच्यासह सहायक फौजदार शिवाजी देशमुख, पोलीस नाईक गणेश मान्टे, संतोष वाढेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अशोक ठोंबरे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मयताच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
चांधई ठोंबरी येथे एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST