अंबड येथे एकाचे दीड लाख लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:37+5:302021-05-07T04:31:37+5:30

कोरोना रुग्णाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या जालना : परतूर तालुक्यातील शिरसगाव येथील ज्ञानेश्वर सोपानराव माटे व त्यांच्या मुलावर जालन्यातील ...

One and a half lakh was extended at Ambad | अंबड येथे एकाचे दीड लाख लांबविले

अंबड येथे एकाचे दीड लाख लांबविले

कोरोना रुग्णाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

जालना : परतूर तालुक्यातील शिरसगाव येथील ज्ञानेश्वर सोपानराव माटे व त्यांच्या मुलावर जालन्यातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी दुपारी ज्ञानेश्वर माटे हे त्यांच्या खोलीत नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच याची माहिती कदीम जालना पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यावर शोध घेतला असता, जुना जालना भागातील रेल्वे फाटकाजवळ एकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह ज्ञानेश्वर माटे यांचाच असल्याचे समोर आले. मृतदेहाची कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी एक कोरोना रुग्ण मोटारसायकल घेऊन पळून गेला होता, त्यावेळी त्याचा ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांनाच गुरुवारी पुन्हा एक रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: One and a half lakh was extended at Ambad