सव्वा किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:22+5:302020-12-28T04:16:22+5:30
एका दुचाकीवरून गांजाची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती सपोनि. ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीनुसार ठाणे प्रभारी अधिकारी ...

सव्वा किलो गांजा जप्त
एका दुचाकीवरून गांजाची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती सपोनि. ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीनुसार ठाणे प्रभारी अधिकारी गौर हसन, सपोनि. ठाकरे, पोउपनि. अंभोरे, कर्मचारी गणेश शिंदे, संजय वैद्य, सॅम्युअल गायकवाड यांच्या पथकाने परतूर- सेलू मार्गावरील वरफळनजीक सापळा लावला. त्यावेळी एका दुचाकीला (एम.एच.- १६ ए.एफ.- ७०७०) थांबविण्यास इशारा केला. त्यावेळी दुचाकीस्वाराने दुचाकी जोरात घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु दुचाकी स्लीप झाल्याने खाली पडली. पोलिसांनी शंकर रामदास पवार याला ताब्यात घेतले. तर सोनू ऊर्फ रामचंद्र अंकुश घोडे (दोघे रा. सेलू, जि. परभणी) हा घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पोउपनि. अंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. ठाकरे करीत आहेत.