दीडएकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:02+5:302021-02-05T08:06:02+5:30

हुरडा पार्ट्या लागल्या रंगू बदनापूर : सध्या तालुका व परिसरात हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. या भागात शाळूज्वारी, गव्हाची ...

One and a half acres of sugarcane dust | दीडएकर ऊस खाक

दीडएकर ऊस खाक

हुरडा पार्ट्या लागल्या रंगू

बदनापूर : सध्या तालुका व परिसरात हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. या भागात शाळूज्वारी, गव्हाची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे शेतकरी सहकुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यासह हुर्डा पार्ट्या करताना दिसत आहेत.

दिंडीचे स्वागत

घनसावंगी : बोरकिनी ते भगवानगड या पायी दिंडीचे तालुक्यातील मासेगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी दिंडीचालक दिनकर मुसळे, नारायण महाराज यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.

रोहित्राची दुरवस्था

वालसावंगी : येथील जवळपास चार ते पाच रोहित्र नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे गावातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून रोहित्र दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.

पारितोषिकाचे वितरण

बदनापूर : मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना पोनि. मारूती खेडकर, तहसीलदार छाया पवार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

Web Title: One and a half acres of sugarcane dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.