शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

तेलाच्या दरात भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 4:11 AM

संजय लव्हाडे जालना : जालना बाजारपेठेत सध्या ग्राहक सुस्‍त आहेत. सोयाबीनसह सर्व प्रकारची खाद्यतेले, तूर, हरभरा, साखर व ड्रायफ्रुट ...

संजय लव्हाडे

जालना : जालना बाजारपेठेत सध्या ग्राहक सुस्‍त आहेत. सोयाबीनसह सर्व प्रकारची खाद्यतेले, तूर, हरभरा, साखर व ड्रायफ्रुट आणि डाळींच्या दरात तेजी दिसून येत आहे. दुसरीकडे सराफा बाजारात सोन्‍याचा भाव स्‍थिर तर चांदीमध्ये मंदी दिसून येत आहे.

सोयाबीनमध्ये आलेली तेजी थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी सोयाबीनमध्ये लोअर सर्कीटनंतर, अप्पर सर्कीट सलग दोन दिवस दिसून आले. एनसीडीएक्‍सवर सोयाबीनच्या दराने दहा हजारांचा आकडा पार केला आहे. सोयाबीनची आवक खूपच कमी असल्‍याने भावात विक्रमी तेजी दिसून येत आहे. सोयाबीनच्या वाढत्या आलेखाविषयी बोलायचे झाले तर एका महिन्‍यात ३५ टक्क्यांची तेजी तर चालू वर्षात १२० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. देशात सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ३९५० रुपये प्रतिक्विंटल आहे तर खुल्‍या बाजारात आता त्‍याची किंमत तीनपटीने वाढली आहे. सध्या सोयाबीनला दहा हजारांपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. जालना बाजारपेठेत सोयाबीनची दररोज आवक १०० पोती आहे. त्‍यात १००० रुपये क्विंटलमागे वाढल्‍यानंतर भाव ९३०० ते ९७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दरम्‍यान, सोयाबीनचे नवीन पीक बाजारपेठेत येण्यास आणखी दोन महिन्‍यांचा कालावधी लागणार आहे. त्‍यामुळे सोयाबीनमध्ये आणखी तेजी येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सोयाबीनच्‍या तेजीमुळे सर्व खाद्यतेलांमध्ये ४०० ते ५०० रुपये क्विंटलमागे वाढले आहेत. विशेष म्‍हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातही तेलामध्ये मोठी तेजी आहे. सूर्यफूल तेल १६०००, पामतेल १३६००, सोयाबीन तेल १५२००, सरकी तेल १५८००, करडी तेलाचे २२००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर गेले आहेत. ग्राहक नसतानाही तेलाचे भाव मागील काही दिवसांपासून एकतर्फी तेजीत आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्‍च्‍या काजूच्‍या कमतरतेमुळे गेल्‍या दोन-तीन महिन्‍यांत मोठी तेजी आली आहे. कच्चे काजू गेल्‍या तीन महिन्‍यांत इंडोनेशियातून ११२५ ते ११५० डॉलरमध्ये आयात केले जात होते. सध्या त्‍याची खरेदी १८०० डॉलरमध्ये होत आहे. बाजारात तुकडा काजूची कमतरता असून, सध्या सर्व ड्रायफ्रुटमध्ये किलोमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत तेजी आलेली आहे.

सोन्याचे भाव स्थिर तर चांदीमध्ये मंदी

एका अहवालानुसार अमेरिकेत कोणत्‍याही वस्‍तूमध्ये व्‍याज दरात वाढ होणार नाही. सोन्‍याच्‍या बॉण्डमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे असतानाही डॉलरमध्ये मोठी घसरण झाली आहे. ज्‍यामुळे सुरक्षित गुंतवणूक लक्षात ठेवून सोन्‍याचे भाव वाढणार आहेत. सोन्‍याची मागणी सध्या वाढत आहे. मागणी वाढल्‍यामुळे वायदा बाजारात एमसीएक्‍स सोने आणि चांदीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र, स्‍थानिक बाजारपेठेत सोन्‍याचे भाव सध्या स्‍थिर आहेत. सध्याचे भाव ४९५०० प्रति तोळा, तर चांदीमध्ये किलो मागे १००० रुपयांची मंदी आली असून, भाव ६८००० रुपये प्रतिकिलो आहेत.