शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी वाचला विविध समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:47 IST

हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आमदार अंबादास दानवे यांनी शुक्रवारी जालना नगर पालिकेसह जिल्हा परिषदेच्या कामकाजांचा आढावा घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे आमदारअंबादास दानवे यांनी शुक्रवारी जालना नगर पालिकेसह जिल्हा परिषदेच्या कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी न.प. तसेच जि.प.च्या सर्व विभागप्रमुखांनी आमदार दानवे यांच्या पुढे समस्यांचा पाढा वाचला. यावेळी न.प. अध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी जिल्हा परिषदेत असलेली रिक्त पदांसह अन्य विविध समस्या अधिवेशनात मांडून त्या सोडव्यात अशी मागणी यावेळी केली.स्थानिक स्वराज्य मतदार संघातील शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी अधिवेशनापूर्वी प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते शुक्रवारी जालना दौºयावर आले होते. त्यांनी सकाळी जालना पालिकेतील पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांची बैठक टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेतली. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी आ. दानवेंचे स्वागत केले. यावेळी पालिकेतील विविध विभागातील समस्यांची मांडणी त्यांच्या समोर केली.जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत आ. अंबादास दानवे यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी कोल्हापुरी बंधा-यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी दहा कोटीची मागणी केली. तसेच वर्ग खोल्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी विशेष निधीची गरज असून, एक हजार नवीन वर्ग खोल्यांची गरज असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील वाढीव आरोग्य केंद्राचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर केला आहे, त्याचा पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी अध्यक्ष खोतकरांनी केली.तसेच आरोग्य केंद्रातील गैरहजर वैद्यकीय अधिका-यांवर कारवाईचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिका-यांना द्यावेत अशी मागणी यावेळी दानवेंकडे उपाध्यक्ष सतीश टोपे व अन्य सदस्यांनी केली.या बैठकीला अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, राजू वैद्य, सभापती बनसोडे, रघुनाथ तौर, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जि.प. सदस्य जयमंगल जाधव, फुगे, अवधूत खडके यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.यावेळी बांधकाम विभाग, पशुवैद्यकीय अधिकाºयांची २१ रिक्त पदे भरणे, बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यासह पाच कनिष्ठ अभियंते आणि कर्मचा-यांची रिक्त पदे आहेत. तसेच समाज कल्याण विभागात १७ मंजूर पदांपैकी केवळ ६ पदे भरली असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शहा आलम खान, गणेश राऊत यांनीही अंबादास दानवे यांची वैयक्तिक पातळीवर भेट घेऊन चर्चा केली. विष्णू पाचफुले यांच्या निवासस्थानी आ. दानवे यांचा सत्कार करण्यात आला.जालना पालिका : नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी मांडल्या विविध समस्यास्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे आ. अंबादास दानवे यांनी आढावा घेण्यासाठी जी बैठक घेतली प्रथम त्यांचे स्वागत अध्यक्षा गोरंट्याल यांनी स्वागत केले. यावेळी शहरातील विविध समस्या आणि लागणाºया निधीबद्दल गोरंट्याल यांनी दानवेंकडे मागणी केली. आ. दानवे तसेच आ. कैलास गोरंट्याल यांनी मिळून आता शहराच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्या ते सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत, शिवसेनेचे गटनेते निखिल पगारे, राष्ट्रवादीचे नेते शाह आलम खान यांनी दानवेंना समस्यांची माहिती दिली. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी प्रमुख योजनांसाठी लागणाºया निधीची माहिती दिली. नगरसेवक पाचफुले यांनी नगरसेवकांचे मानधन वाढीसह महानगर पालिके प्रमाणे नगरसेवकांना विशेष निधी दिला जातो तसाच निधी सर्व नगरसेवकांना द्यावा अशी मागणी केली.सिंचन अधिका-याची कानउघाडणीसिंचन विभागातील अधिका-यास आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यात असलेले सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे व त्यांची स्थिती तसेच किती बंधारे विना गेटचे आहेत.पाझर तलावांच्या नादुरूस्तीची माहिती बैठकीत नीट सांगता न आल्याने आ. अंबादास दानवे यांनी त्या अधिका-याची कान उघाडणी करून किमान आपल्या विभागाची तरी सविस्तर माहिती ठेवावी, अशी आशा व्यक्त केली.

टॅग्स :MLAआमदारAmbadas Danweyअंबादास दानवेJalna z pजालना जिल्हा परिषदJalana Muncipalityजालना नगरपरिषद