लोकमान्य सार्वजनिक वाचनालयातर्फे पदाधिका-यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:16+5:302021-01-01T04:21:16+5:30
भोकरदन : येथील लोकमान्य सार्वजनिक वाचनालयातर्फे व्यापारी संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. लोकमान्य वाचनालयात नुकतीच कार्यकारिणी सदस्यांची बैठक ...

लोकमान्य सार्वजनिक वाचनालयातर्फे पदाधिका-यांचा सत्कार
भोकरदन : येथील लोकमान्य सार्वजनिक वाचनालयातर्फे व्यापारी संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
लोकमान्य वाचनालयात नुकतीच कार्यकारिणी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यापारी संघटनेच्या भोकरदन तालुकाअध्यक्षपदी महाद डोभाळ, उपाध्यक्ष विजय जैन व सचिव योगेश शर्मा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे सचिव नंदकिशोर देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, व्यापारी संघटनेचे हुकूम चुडावत, वाचनालयाचे अध्यक्ष जी.व्ही. देशमुख, सचिव नंदकिशोर देशमुख, सहसचिव विनायक औटी, संचालक विश्वास जाधव, पूनमसिंग जारवाल, अरुण जावळे, नारायण जावळे यांची उपस्थिती होती.
----------------------
फोटो
कृष्णा वाघ यांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार प्रदान
भोकरदन : तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक कृष्णा वाघ यांना सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील ५१ मान्यवरांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी डॉ. सागर गरुड, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस, सपोनि घनश्याम सोनवणे, नालंदा लांडगे, उद्योजक नामदेव खराडी, मनोज पवार, दिनेश गुप्ता, देविदास पंडित, सुमित पंडित, पूजा पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.