फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST2021-03-09T04:33:57+5:302021-03-09T04:33:57+5:30

घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास भोकरदन : तालुक्यातील कोसगाव येथील घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ६ ...

Offenses in cases of fraud | फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा

फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा

घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास

भोकरदन : तालुक्यातील कोसगाव येथील घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी विजय देवाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पलंगावर ठेवलेले दोन मोबाइल चोरीस

जालना : घरातील पलंगावर ठेवलेले दोन मोबाइल चोरट्याने चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गोविंद अनिल श्रीरामवार यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना. उबाळे हे करीत आहेत.

मुद्रा लोन वाढून देतो म्हणून फसवले

जालना : तुमचे मुद्रा लोनची रक्कम वाढून देतो, असे म्हणून फिर्यादीला ऑनलाइन ६८ हजार रुपये टाकायला लावून फसवणूक केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी सतीश शिवाजी डोंबे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुमित गुप्ता याच्याविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Offenses in cases of fraud