१८ जणांना बाधा, एकाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:30 IST2021-01-03T04:30:40+5:302021-01-03T04:30:40+5:30
जालना : जिल्ह्यातील १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे शनिवारी प्राप्त अहवालात समोर आले आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या एकाला रुग्णालयातून ...

१८ जणांना बाधा, एकाची कोरोनावर मात
जालना : जिल्ह्यातील १८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे शनिवारी प्राप्त अहवालात समोर आले आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या एकाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार २०७ वर गेली असून, त्यातील ३५० जणांचा मृत्यू झाला आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील १० जणांचा समावेश आहे. तर तांदूळवाडी १, परतूर शहर १, अंबड शहर १, भोकरदन शहर १, थिगळखेडा १, बुलडाणा येथील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजवर १९ हजार २५६ संशयित आढळून आले आहेत. त्यातील १३ हजार २०७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उपचारादरम्यान ३५० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील उपचारानंतर १२ हजार ५८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.