२ लाख ६० हजार शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:00+5:302021-02-05T08:02:00+5:30
शाळांमध्ये पोषण आहर शिक्षकांच्या देखरेखीखाली शिजवून विद्यार्थ्यांना दिला जात होता. यात तांदूळ, भाजीपाला, तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ ...

२ लाख ६० हजार शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार
शाळांमध्ये पोषण आहर शिक्षकांच्या देखरेखीखाली शिजवून विद्यार्थ्यांना दिला जात होता. यात तांदूळ, भाजीपाला, तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ आदींचे वाटप केले जात होते; परंतु, कोरोनामुळे आता विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप केले जात आहे, तसेच उपलब्धतेनुसार कधी तूर डाळ, कधी हरभरा, कधी मसूर डाळीचे वाटप केले जात आहे. महिन्यानिहाय वाटप सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पालक शाळेतून नेतात आहार...
कोरोनापूर्वी विद्यार्थ्यांना शिजवून पोषण आहाराचे वाटप केले जात होते. त्यात भातामध्ये विविध डाळींच्या भाज्यांचाही समावेश होत होता. यात पालेभाज्यांचा वापर होत होता; परंतु कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि आहार शिजविणेही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेतील पालकांना शाळेत बोलावून शासनाकडून उपलब्ध होणारे तांदूळ, विविध प्रकारच्या डाळींचे वाटप केले जात आहे.
कोरोनामुळे शालेय पोषण आहार शिजवून न देता मुलांना तांदूळ, उपलब्ध असलेली डाळ विद्यार्थ्यांना वाटप केली जात आहे. शासन निर्देशानुसार पोषण आहाराचे वाटप सुरू आहे.
- कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी.
जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी
२६२७४१
शहरी लाभार्थी
२३९२९७
ग्रामीण लाभार्थी
२३४४४