रोजगार हमीच्या कामांवरील मजुरांची संख्या बारा हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:07+5:302021-01-04T04:26:07+5:30

या कामांमध्ये सर्वांत जास्त कामे ही सामाजिक वनीकरण विभागाकडून केली जात आहेत. यात रोपवाटिकेत अधिकची कामे असून, सध्या या ...

The number of workers on employment guarantee works is over twelve thousand | रोजगार हमीच्या कामांवरील मजुरांची संख्या बारा हजारांवर

रोजगार हमीच्या कामांवरील मजुरांची संख्या बारा हजारांवर

या कामांमध्ये सर्वांत जास्त कामे ही सामाजिक वनीकरण विभागाकडून केली जात आहेत. यात रोपवाटिकेत अधिकची कामे असून, सध्या या सामाजिक वनीकरण विभागात सर्वांत जास्त म्हणजे चार हजार ८०४ मजूर असून, त्यापाठोपाठ कृषी विभागात मजुरांची संख्या जास्त आहे. कृषी विभागात चार हजार २०० मजूर कामावर आहेत. वनविभागातही अनेक लहान-मोठी कामे सुरू आहेत.

एकूणच आता या मजुरांची नोंदणी ही ऑनलाइन झाली असून, त्यांना देण्यात येणारा पैसा हा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. जवळपास प्रत्येक मजुराचे आधार कार्ड बँक खात्यांशी संलग्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चौकट

विहिरींचा कोट्यवधींचा निधी गेला होता परत

जालना जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून तीन ते चार वर्षांपूर्वी वैयक्तिक लाभाच्या विहिरींच्या मंजुरीच्या मुद्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे त्या काळात अधिकाऱ्यांच्या ताळमेळाअभावी जवळपास १३५ कोटी रुपयांचा निधी हा परत गेला होता. यंदाही विहिरींची कामे गतीने करावीत, असे निर्देश आहेत. ही कामे करताना जास्तीत जास्त विहिरींची कामे व्हावीत, असा याचा अर्थ होता; परंतु त्या काळात चुकीचा अर्थ काढल्याने तो निधी परत गेल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The number of workers on employment guarantee works is over twelve thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.