रेल्वेगाड्यांची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:13+5:302021-07-31T04:30:13+5:30

काही ठिकाणी थांबतात सध्या जालना रेल्वेस्थानकातून विशेष गाड्या धावत आहेत. काही गाड्या या लहान स्टेशनवरदेखील थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांची ...

The number of trains increased; Stop, but not increase! | रेल्वेगाड्यांची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात!

रेल्वेगाड्यांची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेनात!

काही ठिकाणी थांबतात

सध्या जालना रेल्वेस्थानकातून विशेष गाड्या धावत आहेत. काही गाड्या या लहान स्टेशनवरदेखील थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत नाही. पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत अद्यापही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.

या ठिकाणी रेल्वे

कधी थांबणार?

n जिल्ह्यातून जाणाऱ्या लोहमार्गावर बदनापूर, रांजणी, परतूर, सारवाडी, कोडी, सातोना येथे रेल्वेस्थानक आहे. परंतु, पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांना जालना येथे यावे लागत आहे.

परतूर हे महत्त्वाचे स्टेशन आहे. येथे नेहमी प्रवाशांची मोठी संख्या असते. तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे येथून जाणाऱ्या सर्वच गाड्यांना थांबा देण्यात यावा. - भागवत किंगरे, प्रवासी

पूर्वी पॅसेंजर गाड्या सुरू असल्याने आमच्या स्टेशनवर या गाड्यांना थांबा होता. जालना येथे जाण्यासाठी पॅसेंजर गाड्या सोयीच्या होत्या. आमच्या स्टेशनवर दोन ते तीनच गाड्या थांबत आहेत. पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात.

- नदीम सय्यद, प्रवासी

Web Title: The number of trains increased; Stop, but not increase!