आता तालुकानिहाय शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:00 AM2018-08-21T01:00:28+5:302018-08-21T01:00:52+5:30

जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली.

Now taluka wise scientist | आता तालुकानिहाय शास्त्रज्ञ

आता तालुकानिहाय शास्त्रज्ञ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात बोंड अळीच्या हल्लयाने हैराण शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता तालुका निहाय शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय जिल्हास्तरीय आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली. दरम्यान हा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनासुार घेण्यात आला.
जालना जिल्ह्यात एकूण दोन लाख ९४ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. पैकी ११३ गावांमध्ये या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अंदाजित या बोंड अळीमुळे २० हजार २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे शेतकºयांनी घाबरून जाता ज्या कपाशीच्या झाडात या बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसतो ते फूल खोडून टाकण्याचे आवाहन कृषी विभागा कडून करण्यात येत आहे. जेणेकरून त्या अळीची उत्पत्ती वाढ रोखण्यात मोठी मदत होणार आहे.
यासाठी नेमके काय केले पाहिजे यासाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच बदनापूर येथील कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार येणार आहे. शास्त्रज्ञांप्रमाणे कृषी महाविद्यालयातील जवळपास २०० पेक्षा अधिक विद्यार्थी थेट बांधावर भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस कृषी विस्तार अधिकारी हरिश्चंद्र झनझन, प्रा. अजय मिटकरी यांचीही उपस्थिती होती असे माईनकर यांनी नमूद केले.
युरियाचा वापर कमी करा
सध्या पाऊस पडून गेल्याने बहुतांश शेतकरी हे पिकांना युरिया देण्यासाठी लगबग करत आहे. मात्र युरियामुळे रसशोषण किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतक-यांनी युरीयाचा कमीत कमी वापर करावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे याची गंभीर दखल शेतक-यांनी घ्यावी असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले. एकूणच बोंड अळीमुळे शेतकरी आणि प्रशासन हादरले आहे.
बोंड अळीपासून कपशीचे रक्षण कसे करावे यासाठी कृषी विभागाने माहिती पत्रक काढले आहे. हे जवळपास एक हजार शेतक-यांपर्यंत पोहोचविले असल्याची माहिती कृषी अधीक्षक माईनकर यांनी दिली आहे. तसेच गावागावात मोठे पोस्टर लावूनही जाणीव जागृती करण्यात येत आहे.

Web Title: Now taluka wise scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.