शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

दहा हजार नागरिकांना पालिकेच्या मालमत्ताकरासाठी नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 6:46 PM

चालू वर्षाची थकबाकी ही जवळपास २९ कोटी ३२ लाख रूपये आहे.

ठळक मुद्देशहरात जवळपास ६२ हजार मालमत्ता आहेत.

जालना : पालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत म्हणजेच मालमत्ताकर होय. कोरोनामुळे मालमत्ताकराची वसुली ठप्प झाली होती. ही वसुली करण्यासाठी पालिकेने आता कंबर कसली आहे. जवळपास सर्व व्यवहार पूर्ववत झाल्याने नागरिकांनी आता त्यांच्याकडील थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शहरातील दहा हजार नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

शहरात जवळपास ६२ हजार मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे चालू वर्षाची थकबाकी ही जवळपास २९ कोटी ३२ लाख रूपये आहे. तर एकूण थकबाकी ही ६५ कोटी ४० लाख एवढी आहे. हा करवसुलीचा डोंगर कमी करण्यासाठी पालिकेने सहा पथकांची स्थापना केली आहे. त्यातच ज्यांच्याकडे २५ हजार रूपयांपेक्षा अधिकचा कर थकला आहे, अशांनी तो येत्या पंधरा दिवसांत भरावा, यासाठीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा नागरिकांना मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. ऐन दिवाळी सणामध्ये पालिकेने एक प्रकारचा वसुलीचा धमाका सुरू केला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये पालिकेची केवळ ७९ लाख रुपये एवढीच कर वसुली झाली. यामुळे पालिकेच्या विकासकामांसह प्रशासकीय यंत्रणेवर आर्थिक ताण आला आहे. अनेकांची देणी थकली असून, यामुळे कंत्राटदार आणि अन्य बिल थकलेल्या कंत्राटदारांकडून सततचा पाठपुरावा केला जात आहे. परंतु, पालिकेच्या तिजोरीत पैसाच नसल्याने दिलेेले धनादेशही न वटविण्याच्या सूचना संबंधितांना लेखा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

उद्योजकांकडून वसुलीची आशाजालना नगरपालिकेच्या हद्दीत दोन औद्योगिक वसाहती आहेत. त्यात जवळपास ४०० पेक्षा अधिक लहान- मोठे उद्योग सुरू आहेत. कोरोनानंतर हे उद्योगचक्र वेगाने फिरत आहे. याचा परिणाम पालिकेच्या मालमत्ताकर वसुलीसाठी सकारात्मक होईल, अशी आशा पालिकेकडून व्यक्त केली जात आहे.

नवीन कर आकारणीनुसार नोटीसदहा वर्षांनंतर नगरपालिकेने गतवर्षी मालमत्ता करांचे सर्वेक्षण करून नवीन कर आकारला आहे. या नवीन कर आकारणीनुसार या मालमत्ता वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. नवीन कर आकारणी करताना अनेकांवर तो चुकीचा लादला गेल्याचा आरोप होता. त्यासाठी तीन हजार जणांनी आक्षेप नोंदविले होते.  त्यावर सुनावणी घेऊन निकाली काढण्यात आले.- नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, जालना

टॅग्स :TaxकरJalanaजालना