मंगल कार्यालये, शाळांसह खासगी शिकवणी चालकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST2021-02-22T04:20:25+5:302021-02-22T04:20:25+5:30
भोकरदन : कोरोनातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील ...

मंगल कार्यालये, शाळांसह खासगी शिकवणी चालकांना नोटिसा
भोकरदन : कोरोनातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील नगरपालिकेने शहरातील पाच मंगल कार्यालये, शाळांच्या मुख्याध्यापकांसह खासगी शिकवणी चालकांना सूचनांचे पालन करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
विवाह समारंभात केवळ ५० नागरिक उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नोटिसांमुळे शहरातील दोन मंगल कार्यालयांतील विवाह समारंभ कार्यालयात न लावता दुसरीकडेच लावण्यात आले. ग्रामीण भागातील विवाह समारंभ मोठ्या धूमधडाक्यात करण्यात येत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कडक निर्बंध लावले आहेत. मात्र तरीसुद्धा विनामास्क अनेक जण फिरत आहेत. तसेच विवाह समारंभात हजारो वऱ्हाडी मंडळी एकत्र येत असून, मास्कचा वापर केला जात नाही. भोकरदन शहरात दररोज दोन-तीन बाधित रुग्ण आढळत आहेत. रुग्णसंख्या वाढत गेली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पूजा दुधनाळे, कार्यालयीन अधीक्षक वामन आढे यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.