‘एमएसआरडीसी’च्या कंपनीला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST2021-01-13T05:19:43+5:302021-01-13T05:19:43+5:30
तळणी : येथील बसथांब्यावरील जुन्या बसथांब्याच्या जागी नव्याने सिमेंटचा बसथांबा उभारावा, अशा सूचना भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल ...

‘एमएसआरडीसी’च्या कंपनीला सूचना
तळणी : येथील बसथांब्यावरील जुन्या बसथांब्याच्या जागी नव्याने सिमेंटचा बसथांबा उभारावा, अशा सूचना भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याला शुक्रवारी (दि. ८) दिल्या.
‘लोकमत’मध्ये १७ डिसेंबर रोजी ‘तळणीतील बसथांबा कुठे?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर तळणीचे सरपंच उद्धव पवार यांच्यासह भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शिवदास हनवते यांनीही कंपनीकडे बसथांब्याचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रामस्थांची मागणी व ‘लोकमत’ वृत्ताची दखल घेत, तळणी बसथांब्यावरील जुन्या बसथांब्याच्या जागेवर नव्याने सिमेंटचा बसथांबा उभारण्याच्या सूचना एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांना भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी दिल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ यांची उपस्थिती होती. ‘एमएसआरडीसी’चे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव म्हणाले, तळणी येथील जुन्या बसथांब्याच्या जागेवर नव्याने बसथांबा उभारण्याच्या सूचना कंपनीला दिल्या आहेत.