शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा; मनोज जरांगेंचा सरकारला ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 18:12 IST

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला शेतकरी प्रश्नावर ३० सप्टेंबरचा अल्टीमेटम

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : सरकारने ३० सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, कर्जमुक्ती कशी होत नाही, हेच पाहतो, असा नवा अल्टीमेटम मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला. सरकारने ३० सप्टेंबरच्या आत कायमची कर्जमुक्ती करायची, सगळा पिकविमा, अनुदान द्यायचे. आता शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा मिळत नाही हे आम्ही बघतो, असे इशारा देखील जरांगे यांनी दिला.

आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्याबाबत मनोज जरांगे चाचपणी करत आहेत. त्यांच्या आवाहनानंतर इच्छुकांनी विधानसभेच्या संपूर्ण माहितीसह गर्दी केली आहे. आतापर्यंत सातशे ते आठशे अर्ज आली असतील. छाननी सुरू आहे, आणखी काही इच्छुक भेट आहेत, अशी माहिती जरांगे यांनी दिली. विरोधात बोलणारेही तुमच्या भेटीला येत आहेत, या प्रश्नावर जरांगे म्हणाले की, ही गोरगरीब समाजाची लढाई आहे. जातीधर्माच्या विरोधात काम केल, त्याचा त्यांना पश्चाताप झाला हेच महत्त्वाचं. मराठ्यांच्या मता शिवाय कोणताच पक्ष निवडून येत नाही हे त्यांना माहिती आहे, असे जरांगे म्हणाले.

शेतकऱ्याला कर्जमाफी नको कर्जमुक्त करादरम्यान, जरांगे यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न हाती घेतला आहे. ते म्हणाले, शेतकरी म्हणजे आपणच, त्याला किती दिवस फसवायचं, कर्जमाफी नको कर्जमुक्ती करा कायमची. तुम्ही कर्जमुक्ती केल्यानंतर कर्जही देऊ नका. शेतकऱ्यांना ज्या सुविधा लागतात त्या द्या. त्यांना कायमची वीज द्या, पाण्याची सुविधा करा, अशी मागणी जरांगे यांनी केली. तसेच शेतमालाला भाव दिला तर शेतकरी आत्महत्या होऊच शकत नाहीत, असा दावाही जरांगे यांनी केला. 

पीक विमा कंपन्या देशाबाहेच्या आहेत का?पिकं विमा भरल्यावर तो मिळत नाही. सरकारचा या कंपन्यांवर धाक कसा नाही. त्यांच्याकडून टॅक्स घेत नाहीत का ?  विना परवाने चालतात का कंपन्या?  असा सवाल जरांगे यांनी करत सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळाले पाहिजे, अशी मागणी केली. पिक विमा कंपन्यांचे संरक्षण करून शेतकऱ्याला मारता का? असा जाब विचारात जरांगे यांनी या कंपन्याकडे सुद्धा आम्ही लक्ष देणार आहोत असा इशारा दिला. पैसे घेताना गोड वाटते अन् विमा देताना हे कागद आणा ते आणा असे करता. दुसरीकडे सरकार म्हणते कंपन्या बाहेरच्या आहेत. त्या कंपन्या काय देशा बाहेरच्या आहेत का ? तुम्हाला तिकडे जाता येत नाही. किती फसवणार शेतकऱ्यांना, असे म्हणत जरांगे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणFarmerशेतकरी