ओबीसी आरक्षणावर सकारात्मक निर्णय घेतल्या शिवाय निवडणुका नाही : आ. सावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:35+5:302021-06-23T04:20:35+5:30
यावेळी त्यांनी अन्य मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यात शनिवारी म्हणजेच २६ जून रोजी संपूर्ण राज्यात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात ...

ओबीसी आरक्षणावर सकारात्मक निर्णय घेतल्या शिवाय निवडणुका नाही : आ. सावे
यावेळी त्यांनी अन्य मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. त्यात शनिवारी म्हणजेच २६ जून रोजी संपूर्ण राज्यात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यात जालना जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजाने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपच्या दोन पत्रकार परिषद कशा होत आहेत, असे विचारले असता, ते म्हणाले की, यात आमच्यात कुठलीच गटबाजी नाही. केवळ आ. लोणीकर हे आ. परतूर येथे होते. त्यामुळे त्यांनी तेथे संवाद साधला असावा असे सांगून सावे यांनी वेळ मारून नेली. या पत्रकार परिषदेस आ. तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, आ. नारायण कुचे, माजी आ. विलास खरात, शहराध्यक्ष राजेश राऊत, ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्ष अशोक पांगारकर, सिद्धिविनायक मुळे, अतिक खान, आदींची उपस्थिती होती.