नवोदय विद्यालयातील नऊ विद्यार्थी पॉझिटिव्ह - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:19 IST2021-02-22T04:19:57+5:302021-02-22T04:19:57+5:30
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आंबा येथील ...

नवोदय विद्यालयातील नऊ विद्यार्थी पॉझिटिव्ह - A
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. आंबा येथील नवोदय विद्यालयातील १४० विद्यार्थ्यांची बुधवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे स्वॅब जालना येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री सर्व विद्यार्थ्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी ९ विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. पॉझिटिव्ह सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील एका इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य शैलेश नागदेवते यांनी दिली. या विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंभुरे, डॉ. जाहेद, डॉ. महादेव उनवणे यांच्यासह आरोग्य कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्राचार्य शैलेश नागदेवते यांनी केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी केले आहे.