निमखेडा बु. येथे जाणीव जागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST2021-09-11T04:30:08+5:302021-09-11T04:30:08+5:30

महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ, नागपूर, पंचायत समिती जाफराबाद, सुवर्णलंकार विविध विकास मंडळ आणि ग्रामपंचायत निमखेडा जैवविविधता समिती यांच्या ...

Nimkheda Bu. Awareness program here | निमखेडा बु. येथे जाणीव जागृती कार्यक्रम

निमखेडा बु. येथे जाणीव जागृती कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ, नागपूर, पंचायत समिती जाफराबाद, सुवर्णलंकार विविध विकास मंडळ आणि ग्रामपंचायत निमखेडा जैवविविधता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी गावकऱ्यांसोबत गटचर्चा, गावशिवार फेरीतून विविध वनस्पतींची ओळख करणे, त्या वनस्पतींचे गुणधर्म सांगणे, जलसिंचन, पशुपक्षी

यांची ओळख आणि त्यांचे संवर्धन, नैसर्गिक साधनांतून आर्थिक विकास साध्य करणे, निसर्गाने मानवाला दिलेला अनमोल ठेवा जतन व्हावा, त्यातून उद्योग, व्यवसायनिर्मिती व्हावी, गाव अर्थसंपन्न व्हावे, गावाला जैविक विविधता जतन करण्याचा ध्यास लागावा, यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक शुभम शुक्ला, गजानन उदावंत यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सरपंच सविता हिवाळे, उपसरपंच सुभाष चव्हाण, सुखदेव चव्हाण, समाधान चव्हाण, गणेश चव्हाण, नाना चव्हाण, सुभाबाई खंदारे, मंजुळा चव्हाण, ग्रामसेविका प्रतिभा काळे, दत्तात्रय खरात, प्रदीप चव्हाण, गंजीधर चव्हाण, संतुक चव्हाण, दत्तू कुदर, मीना काळे, कमल जाधव, शांता कासारे, अलका घोरपडे, शिवगंगा हिवाळे, मैना खंडागळे,

अनिता खंडागळे, जिजा खंडागळे, लता कासारे, मंदा खंडागळे, रंजना कासारे, शारदा झोटे, सिंधू रावळकर, अनिता बोर्डे, लता खंडागळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Nimkheda Bu. Awareness program here