पान दोनवरील पट्ट्यातील बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:46+5:302021-01-19T04:32:46+5:30
जालना : भीमसेना संघटनेच्या कोडी कारला (ता. जालना) अध्यक्षपदी ज्ञानेश्वर हांडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल जिल्हा अध्यक्ष ...

पान दोनवरील पट्ट्यातील बातम्या
जालना : भीमसेना संघटनेच्या कोडी कारला (ता. जालना) अध्यक्षपदी ज्ञानेश्वर हांडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल जिल्हा अध्यक्ष रंजय रत्नपारखे, जिल्हा युवा अध्यक्ष विजय हिवाळे, तालुका अध्यक्ष गौतम साळवे आदींनी हांडके यांचे स्वागत केले आहे.
मराठी भाषा संवर्धनानिमित्त मार्गदर्शन
जालना : शहरातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात १४ जानेवारी ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने सोमवारी शाळेत आकाश गायकवाड यांनी ‘मराठी भाषा व संवर्धन’ या विषयावर माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक मनीष अग्रवाल, उपमुख्याध्यापक दशरथ, लांडगे, जोशी आदींची उपस्थिती होती.
तीर्थपुरीत अलका चिमणे यांचा विजय
तीर्थपुरी : येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय उमेदवार अलका चिमणे या विजयी झाल्या. तीर्थपुरी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होणार असल्याने येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमधून सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी १६ जागेवरील अर्ज मागे घेतले होते. केवळ वॉर्ड क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी सर्वपक्षीय अलका चिमणे व गीता चिमणे यांच्यात लढत झाली होती.
हसनाबादेत भाजपचा दणदणीत विजय
हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील हसनाबाद ग्रामपंचायतीच्या लढतीत भाजपचे सुरेश लाठी यांच्या पॅनेलला १३ पैकी ११ जागांवर यश मिळाले आहे. याबरोबरच गोषेगाव येथे ९ पैकी ६ जागा भाजपचे मधुकर मोहिते यांच्या पॅनेलने जिंकल्या. सिरसगाव वाघ्रळ येथील भाजपचे गजानन इंगळे यांच्या पॅनेलला ९ पैकी ८, चिंचोली येथे भाजपचे ११ पैकी नऊ सदस्य निवडून आले असल्याची माहिती देण्यात आली.