कुंडलिका नदीवर नवीन पूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:21 IST2017-11-24T00:20:55+5:302017-11-24T00:21:34+5:30
जालना शहरातील नवीन व जुना जालन्याला जोडणाºया लोखंडी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे आयुर्मान संपले असल्याचा अहवाल संबंधित विभागाच्या अधिका-यांनी यापूर्वीच दिला आहे

कुंडलिका नदीवर नवीन पूल!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातील नवीन व जुना जालन्याला जोडणाºया लोखंडी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे आयुर्मान संपले असल्याचा अहवाल संबंधित विभागाच्या अधिका-यांनी यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे या पुलाच्या नवीन बांधकामासाठी पहिला टप्पा म्हणून एक कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र नगर विकास खात्यातर्फे पालिका प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.
जालना शहरात आॅक्टोबर महिन्यात विकास परिषद व शहरातील सिमेंट रस्त्याच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दौºयावर आले होते. यावेळी खा. रावसाहेब दानवे यांनी नवीन बायपाससह विविध मागण्या केल्या होत्या.