शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
2
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
3
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
4
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
5
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
6
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
7
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
8
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
9
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
11
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
12
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
13
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
14
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
15
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
16
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
17
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
18
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
19
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
20
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...

जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:29 AM

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. मंठा तसेच जालन्यात झालेल्या दोन्ही सभांना काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ज्या उत्साहाने हजेरी लावली त्यातून काँग्रेसला पुन्हा अच्छे दिनची आशा पल्लवित झाली आहे.जालना जिल्ह्यात गेल्या काहीवर्षांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली होती. परंतु थेट नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या निवडणुकीत आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोठे यश मिळविले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या आहेत.एकूणच लोकसभेचा अपवाद वगळता काँग्रेसने युतीसोबत दोन हात करून आपले अस्तित्व सिध्द केले आहे. जालन्यात माजी आ. कैलास गोरंट्याल आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या जणूकाही खो-खो चा सामानाच रंगतो. याला अपवाद केवळ २००९ चा म्हणावा लागेल. त्यावेळी अर्जुन खोतकर यांनी विधानसभेची निवडणुक ही घनसावंगी मतदार संघातून लढविल होती. त्यांनी तेथे देखील ८३ हजार मते मिळवून राज्यात शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपेक्षा जास्त मतदान खेचले होते.२९१४ ची निवडणुकीही कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर तसेच अरविंद चव्हाण यांच्यात चुरशीची झाली होती. ऐन वेळी भाजपने युती तोडल्याचा सर्वात जास्त फायदा हा अर्जुन खोतकरांना झाला आणि त्यांनी बाजी मारली. अरविंद चव्हाण यांना भाजपने उमेदवारी देऊन मोठी खेळी खेळली होती. आता पुन्हा निवडणुकीचे नगारे वाजण्यास प्रारंभ झाला आहे. आधी दिल्लीसाठीच्या निवडणुकांपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत.शिवसेने सोबत भाजपला युती करण्याची गरज आता चांगलीच जाणवू लागली असून, त्यांच्या शिवसेनेविषयच्या भूमिकेत यू-र्टन आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्ते अद्यापही संभ्रमात असून, युती होते की, स्वतंत्र लढतात याकडे भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मध्यंतरी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाच्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. राजेश टोपेंना लोकसभेची संधी पुन्ह देण्याविषयी चाचपणी केली होती. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडवून घेऊन त्यात एक तर राजेश टोपे किंवा आ. सतीश चव्हाण यांना उमेदवारी देऊन राजकीय जुगार खेळण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी कैलास गोरंट्याल आणि माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांची तोंड भरून स्तुती केल्याने काँग्रेसमध्ये अद्यापही कैलास गोरंट्याल यांचा शब्द महत्वाचा ठरतो, हे दिसून आले. त्यामुळे जनसंघर्ष यात्रेमुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य अवतरल्यास नवल वाटू नये, परंतु या चैतन्याच्या वातावरणात काँग्रेसच्या नेतृत्वाला सातत्य ठेवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.

टॅग्स :Congress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाण