पथदिवे दुरूस्तीकडे होतेय दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST2021-02-25T04:37:39+5:302021-02-25T04:37:39+5:30
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य जालना : जालना- मंठा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालविणे अवघड झाले आहे. ...

पथदिवे दुरूस्तीकडे होतेय दुर्लक्ष
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
जालना : जालना- मंठा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून चालविणे अवघड झाले आहे. अनेकवेळा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ओझा यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सत्कार
तीर्थपुरी : कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्यांचा धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कुंभार-पिंपळगावचे रहिवासी गणेश ओझा यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी टेहळे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, शंकर सांगुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अध्यक्षांचा जमिअत उल्मातर्फे केला सत्कार
आष्टी : येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे, उपाध्यक्ष सुमता पाटील, सचिव शेख हबीब, मार्गदर्शक राजेंद्र बाहेती यांचा आष्टी जमिअत उल्मातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काजी अबजोलोदीन कादरी, हाजी महेबूब, मुफ्ती मशिद, हाफिज अन्वर, मौलाना अलिम, मौलाना अदिल, हाजी रहेमत पठाण, मुजिब जमीनदार, वसीम जमीनदार आदी उपस्थित होते.
कुंभार-पिंपळगाव येथे जयंती साजरी
जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार-पिंपळगाव येथील शरदचंद्रजी पवार उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण उपाध्ये, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत थोरात यांची उपस्थिती होती. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याविषयी अमूल्य मार्गदर्शन केले.
गुरुवारी वेबिनारचे आयोजन
जालना : जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत झूम ॲपवर वेबिनार आयोजित केले आहे. यावेळी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अध्यक्ष उपायुक्त आदींची उपस्थिती राहणार आहे.
मास्क न लावता फिरणाऱ्यांना दंड
भोकरदन : शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या ५६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे ११ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. भोकरदन शहरासह परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांना सूचना देऊनही त्याचे पालन होत नाही. सर्वजण बेफिकिरीने फिरत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढत चालला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूजा वाघमारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार
जालना : मंठा तालुक्यातील लिंबे वडगाव येथील समाजकार्यात तत्पर असणाऱ्या पूजा वाघमारे यांना नुकत्याच मुरबाड (जि. ठाणे ) येथे पार पडलेल्या कार्यक्रमात नाभिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने क्रांतिवीर भाई कोतवाल नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. यावेळी दिग्दर्शक एकनाथ देसले, इतिहास संशोधक वसंत कोळंबे, माधव भाले, सेनाजी काळे, ज्ञानेश्वर गिराम, जिल्हाध्यक्ष कृष्णा पंडित, दत्तात्रय वरपे आदींची उपस्थिती होती.