ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:36+5:302021-02-05T08:04:36+5:30
परतूर : ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळणे आवश्यक असून, सातोनकर परिवाराने त्या सुविधा उपलब्ध करून देऊन मोलाचे काम केल्याचे ...

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे
परतूर : ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळणे आवश्यक असून, सातोनकर परिवाराने त्या सुविधा उपलब्ध करून देऊन मोलाचे काम केल्याचे प्रतिपादन भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले.
परतूर शहरातील मोंढा भागात सातोनकर सोनोग्राफी सेंटर व अद्ययावत हॉस्पिटलचा शुभारंभ शुक्रवारी राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, मंदाताई लोणीकर, कुणाल आकात, सेनेचे मोहन अग्रवाल, श्यामसिंग ठाकूर, डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर, अश्विन अंबेकर, गटविकास अधिकारी अंकुश गुंजकर, मुख्याधिकारी सुधीर गवळी, डिगांबर मुजमुले, नगरसेवक संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण, अॅड. जगन बागल, कृष्णा आरगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सातोनकर हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागात अद्ययावत सुविधा मिळणार आहेत. रुग्णांना आता बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही, असेही लोणीकर म्हणाले. यावेळी मोहन अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगरसेवक राजेश भुजबळ, विजय राखे, बाबूराव हिवाळे, गुलाम हुसेन कुरेशी, दत्तात्रय गायकवाड, सुधाकर सातोनकर, भास्कर सातोनकर, प्रवीण सातोनकर, संजवनी सातोनकर, डॉ. प्रदीप सातोनकर, डॉ. प्रमोद सातोनकर, डॉ. स्रेहल सातोनकर, डॉ. कविता सातोनकर यांच्यासह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.
(फोटो. जाहिरात विभाग)