बचतगटाची चळवळ गतीमान करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:50+5:302021-02-13T04:29:50+5:30
अंबड : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे बचत गटाची चळवळ गतीमान करण्याची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ...

बचतगटाची चळवळ गतीमान करण्याची गरज
अंबड : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे बचत गटाची चळवळ गतीमान करण्याची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ठिकाणी उभे राहत असलेली बहुउद्देशिय इमारत बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
अंबड शहरातील पंचायत समितीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या सभागृह बांधकाम भूमिपूजन व बचत गट कर्ज वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. यावेळी महिला बचत गटाला व्यवसायासाठी कर्जाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हा प्रकल्प संचालक कल्पना क्षिरसागर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश होंडे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, सभापती कृषी सभापती गायकवाड, बालकल्याण सभापती सपाटे, खरेदी-विक्री संघाचे व्हा चेअरमन श्रीराम जाधव, पंचायत समिती सभापती बापू खटके, गट विकास अधिकारी डी.टी. भिसे, निसार देशमुख, चंद्रमणी खरात, औदुंबर बागडे, अवधूत खडके आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक कल्पना क्षिरसागर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय काळे यांनी केले. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागातील अधिकारी, बचत गटाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.
फोटो