राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:50+5:302021-02-08T04:26:50+5:30
अंकुशनगर (महाकाळा) : केंद्र सरकारकडून सातत्याने होत असलेल्या गॅस सिलिंडर व इंधन दरवाढविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद ...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध
अंकुशनगर (महाकाळा) : केंद्र सरकारकडून सातत्याने होत असलेल्या गॅस सिलिंडर व इंधन दरवाढविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या तथा अंबड तालुकाध्यक्ष नितू संजय पटेकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी अंकुशनगर येथे रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक करून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या निर्देशानुसार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी अंकुशनगर येथे नितू संजय पटेकर यांच्यासह परिसरातील महिलांनी रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक करून केंद्र सरकारचा निषेध केला. पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलिंडरचे भाव सातत्याने वाढत आहेत. केंद्र सरकार त्यावर नियंत्रण मिळविण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप नितू पटेकर यांनी यावेळी केला. आंदोलनात परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.
............फोटो- पान १ ... एनसीपी आंदोलन अंकुशनगर
......