५१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:40+5:302021-01-19T04:32:40+5:30
अंबड तालुक्यातील गोंदी, बारसवाडा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असून, वडीकाळ्या ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. शहागड, महाकाळा, वडीगोद्री, ...

५१ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
अंबड तालुक्यातील गोंदी, बारसवाडा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असून, वडीकाळ्या ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. शहागड, महाकाळा, वडीगोद्री, रोहिलागड येथे राष्ट्रवादीला तर कर्जत येथे काँग्रेसला बहुमत मिळाले आहे, असा दावा ज्या- त्या पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. अंबड तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १५ टेबलवर १४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. पाथरवाला ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे ११ सदस्य निवडून आले. रोहिलागड येथे महाविकास आघाडीचे १३ सदस्यांपैकी महाविकास आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाले. महाकाळा येथे राष्ट्रवादी १६, आलमगाव येथे दक्षिणेश्वर नवनिर्माण पॅनेलने ग्रामपंचायतमध्ये वर्चस्व सिद्ध केले.