परतूर तहसीलला यात्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST2020-12-30T04:40:28+5:302020-12-30T04:40:28+5:30

परतूर : ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परतूर तहसील परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तालुक्यात ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत ...

Nature of Yatra to Partur Tehsil | परतूर तहसीलला यात्रेचे स्वरूप

परतूर तहसीलला यात्रेचे स्वरूप

परतूर : ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परतूर तहसील परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तालुक्यात ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतील उमेदवार शेवटचे दोन दिवस राहिल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे तहसील परिसर उमेदवार, कार्यकर्ते व वाहनांनी गजबजला आहे. दरम्यान काही उमेदवार शक्ती प्रदर्शनही करत असल्याने गर्दीत वाढ होत आहे. एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील नामनिर्देशन पत्र ऑनलाईन करतांना उमेदवारांना अडचणी येत आहेत. अनेकदा सर्व्हर डाऊन असल्याने जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीही अडचणी येत आहेत. ऑनलाईन प्रकिया उमेदवारांना जाचक ठरत आहे. तसेच आरक्षीत जागेवरील उमेदवारांना जात प्रमाणपत्रांच्या दोन दिवसांपासून अडचणी येत आहेत. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवार धास्तावले आहेत. तरी प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देवून यातील अडचणी दूर कराव्यात अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ : परतूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील परिसराला आलेले यात्रेचे स्वरूप.

Web Title: Nature of Yatra to Partur Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.