करण लामाच्या सुवर्ण ठोशाने जालन्याचे नाव सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:50+5:302021-01-03T04:31:50+5:30
मराठवाड्यासाठी बॉक्सिंगमध्ये करिअर हे खूपच कमी खेळाडूंनी केले आहे. त्यात लामाचे नाव आता नावारूपास आले आहे. त्याने यापूर्वी बंगोलरश्री ...

करण लामाच्या सुवर्ण ठोशाने जालन्याचे नाव सातासमुद्रापार
मराठवाड्यासाठी बॉक्सिंगमध्ये करिअर हे खूपच कमी खेळाडूंनी केले आहे. त्यात लामाचे नाव आता नावारूपास आले आहे. त्याने यापूर्वी बंगोलरश्री किताब बंगळुरू येथे मिळविला होता. त्याच्यातील ही चमक लक्षात घेऊन अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या मॅट्रिक्स फाइटने दखल घेऊन त्याला स्पॉन्सर केले. तत्पूर्वी करण लामाने दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी त्याच्या या नावीन्यपूर्ण खेळात चमकदार कामगिरी केली होती. त्याची दखल घेत टायगर श्रॉफच्या अकादमीने त्याला स्पॉन्सर केले होते, तसेच डिसेंबरमध्ये झालेल्या याच संस्थेच्या दुबईतील मिक्स मार्शन आर्ट या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. केवळ पंधरा मिनिटांच्या खेळात तुमची चपळाई, तसेच तुम्ही समोरच्या बॉक्सरच्या ठोशांचा कसा बचाव करून ते कितपत सहन करता यातच तुमची खरी कसोटी असल्याचे लामा याने सांगितले.
चौकट
आहार, व्यायामाला महत्त्व
कुठल्याही खेळात आहार, व्यायाम आणि प्रॅक्टिसला मोठे महत्त्व असते. ते याही क्षेत्राला लागू होते. यासाठी मोठा खर्च येत असतो; परंतु त्यासाठी अनेकांची मदत होत असते. अद्यापही मला या मदतीची गरज आहे; परंतु आपण जिद्दी असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून खेळावर लक्ष केंद्रित करतो. आगामी काळात इंग्लंड, तसेच अन्य देशांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळवून देशासह जालन्याचे नाव उंचीवर नेणे हेच आपले ध्येय आहे.
करण सुनील लामा, किक बॉक्सर, जालना