शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

लग्नघरावर शोककळा! दोन दिवसांवर होते लग्न, हळदीच्या दिवशीच नवरीचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 19:48 IST

खड्डा व दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे.

भोकरदन/ वरुड बु, ( जालना) : घरासमोर हळदीचा मंडप सजला होता, तीन तासाने हळद लागणार असतानाच वधूवर काळाने झडप घातल्याने लग्नघरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वरुड ( बु) या गावच्या शिवारात दुचाकी आणि चारचाकीच्या झालेल्या अपघातात वधू आणि आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुचाकीवरुन पिंपळगाव रेणुकाईवरुन दोघे भोकरदनकडे जात होते. तर भोकरदनकडून चारचाकीत दोन दिवसाने लग्न असलेली नवरी आणि तीचे नातेवाईक पारधकडे येत होते. माञ, वरुड ( बु) या गावच्या शिवारात अचानक दुचाकी आणि चारचाकीची समोरसमोर धडक झाली. यात दोन्ही वाहने बाजुच्या नाल्यात उलटली. यात चारचाकीमधील नवरी पूनम बनकर (30) आणि दुचाकीवरील भारत बालाजी चव्हाण ( 54, रा. बुलढाणा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सोनू माऊली वाघमारे (13) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घरात लग्नाची धामधुम सुरू असताना नवरी मुलगी आपल्या परिवारासोबत लग्नाचे साहित्य आणण्यासाठी गेली होती. माञ, रस्त्यातच नियतीने डाव साधल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आज होती हळद, रविवारी लग्नपूनम बनकर हिचा अजिंठा येथील मुलाशी रविवारी ( दि. 24) पारध येथे विवाह होणार होता. लग्नासाठी पूनम मुबंई येथून पारधला आली होती. आज सायंकाळी तिची हळद होती. दरम्यान, दुपारी देवदर्शन आणि सामान खरेदीसाठी पूनम नातेवाईकांच्या सोबत भोकरदनला आली होती. त्यानंतर सायंकाळी सर्वजण चारचाकीने पारधकडे निघाले. यावेळी बंडारगडाजवळ रस्त्यात खड्डा व दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यूmarriageलग्न