जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करिअर कट्ट्यात सहभाग व्हावे : यशवंत शितोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:14+5:302021-09-06T04:34:14+5:30
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र, तसेच स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा, यशवंतराव चव्हाण ...

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करिअर कट्ट्यात सहभाग व्हावे : यशवंत शितोळे
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र, तसेच स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, मंठा, रेणुका महाविद्यालय, मंठा, स्वामी विवेकानंद बी. सी. ए. महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर करिअर कट्ट्याचा या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याच्या उपक्रमाची माहिती व्हावी, त्याचा लाभ घेता यावा, या उद्देशाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे हे होते, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून यशवंत शितोळे, उपप्राचार्य डॉ. सदाशिव कमळकर, प्राचार्य डॉ. अशोक मुसळे, श्याम जवळेकर, डॉ. राजेंद्र उढाण आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. सदाशिव मुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला मार्गदर्शनाची गरज आहे. तरुणांना सन्मानाने उभे राहायचे असेल, सन्मानाने जगायचे असेल, तर करिअर कट्टा या उपक्रमात सहभाग घ्यावा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या किंवा उद्योग व्यवसायामध्ये करिअर करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन घ्यायचे असेल, तर पुणे, दिल्ली येथे हजारो रुपये मोजावे लागतात. ग्रामीण भागात इच्छा आहे, गुणवत्ता आहे, उमदे आहे, परंतु परिस्थिती नाही. त्यामुळे तरुणांनी करिअर कट्टा या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र उढाण यांनी केले. डॉ. पांडुरंग नवल यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र काकडे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. भरत धोत्रे, डॉ. राजेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.